जागतिक तापमान वाढ
"निसर्गाशी नाते जोडुया,
जागतिक तापमान वाढीला दुर पळवुया."
प्रस्तावना -
'आधुनिक काळात जागतिक तापमान वाढीची समस्या संपूर्ण मानवजातीसाठी चिंतेचा विषय बनली आहे. पण जागतिक तापमान वाढ ही अशी समस्या आहे की ती एकदा वाढली की मग तिचा समतोल राखणे फार कठीण होऊन बसते. शास्त्रज्ञांचे असे मत आहे की जर जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण ठेवले नाही तर येणाऱ्या काळात या पृथ्वीवर राहणे अशक्य होईल.
जागतिक तापमान वाढीचा अर्थ -
औद्योगिक क्रांतीपासूनची सरासरी जागतिक तापमान वाढीला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात. सर्वसाधारण शब्दात, ग्लोबल वार्मिंग म्हणजे प्रदूषणामुळे पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ. या समस्येमुळे आपली पृथ्वी दिवसेंदिवस गरम होत चालली आहे. यावर नियंत्रण ठेवले नाही तर येणाऱ्या काळात या पृथ्वीवर राहणे अशक्य होईल. वाढत्या जागतिक तापमानामुळे चक्रीवादळ, पूर, जंगलातील आग, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यांचा धोका वाढतो.
जागतिक तापमान वाढीची करणे -
जागतिक तापमान वाढीची अनेक करणे आहेत जसे की, अंदाधुंद जंगलतोड, गरजेपेक्षा जास्त आधुनिकीकरण, लोकसंख्येचा स्फोट, औद्योगिकीकरण, विविध प्रकारचे प्रदूषण, हरितगृह परिणाम इ. जेव्हा हरितगृहामध्ये कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि पाण्याची वाफ यांसारख्या वायूंचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढू लागते, तेव्हा ते पृथ्वीचे तापमान आवश्यकतेपेक्षा जास्त वाढवते.काही कारणे सोडली तर जागतिक तापमान वाढीच्या समस्येचे मुख्य कारण मानवनिर्मित आहे. ही समस्या वेळीच सोडवली नाही, तर तो दिवस दूर नाही जेव्हा तो मानवतेच्या विनाशाचे कारण बनेल.
ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम-
हवामानातील बदल, अतिउष्णता, समुद्राच्या पातळीत वाढ, नैसर्गिक आपत्ती, ओझोनच्या थराला छिद्र इत्यादी जागतिक तापमानवाढीचे परिणाम आहेत.वाढत्या जागतिक तापमानामुळे चक्रीवादळ, पूर, जंगलातील आग, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यांचा धोका वाढतो.
समस्येवर उपाय-
जागतिक तापमान वाढ टाळण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावा आणि जागतिक तापमान वाढेल असे उपक्रम करू नका किंवा कमी करा. आपण हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी केले पाहिजे. सरकारी एजन्सी, व्यवसाय प्रमुख, खाजगी क्षेत्र, N.G.O. इत्यादि कडून जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत.
"जेव्हा पृथ्वीचे तापमान सामान्य असेल,
तेव्हा आपली पृथ्वीही स्वर्गासारखी बनेल."
No comments:
Post a Comment